मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. यंदा आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी वाढदिवसाच्या दिवशी कुणाचीही भेट घेणे टाळले. परंतू तालुक्यातील त्यांच्या हजारो कार्यकर्ते समर्थक यांनी गावोगावी आमदार शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक छोटे मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच तालुक्यात सर्वत्र आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते. या सर्व गोष्टींमध्ये आमदार सुनिल शेळके भविष्यात मंत्री होणार, असे मोठाले बॅनर लावून शेळकेंच्या मंत्रीपदाची चर्चाही तालुक्यात सुरु करण्यात आली. त्यामुळे मदन बाफना, बाळा भेगडे यांच्यानंतर आता सुनिल शेळके हेही मंत्री होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
लाल दिव्याची गाडी आणि भावी मंत्री…
मावळ तालुक्यात सुनिल शेळके यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हजारो कार्यकर्ते आहेत. अशात लाडक्या आमदारांना भविष्यात मंत्री म्हणून पाहायची हौसही अनेक कार्यकर्त्यांना आहे. अशात आमदारांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी थेट भावी मंत्री आणि लाल दिव्याची गाडी अशा प्रकारचे बॅनक तालुक्यात जागोजागी झळवलेत. त्यामुळे आमदार सुनिल शेळके भविष्यात मंत्री होणार, याचाच दुसरा अर्थ पुन्हा आमदारही होणार, या चर्चांना उधाण आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि खास मानले जातात. तसेच स्वतः अजित दादांचे मावळवर विशेष लक्ष आहे. भविष्यात पक्षाच्या वाटचालीत मावळ सोबत असणे राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. अशावेळी आमदार शेळकेंना मंत्री बनवण्याचा आणि तालुक्यावर पकड ठेवण्याचा मार्ग स्विकारला जाऊ शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही. ( MLA Sunil Shelke will become a minister Banners everywhere in Maval Taluka )
View this post on Instagram
परंतू, दुसरीकडे आमदार सुनिल शेळके यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यामुळे पहिल्या टर्मचे काही महिने शिल्लक राहिलेले असताना त्यांना आता तरी मंत्रीपद मिळू शकते याची शक्यता धुसर आहे. परंतू पुढील निवडणूकीत ते जर पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरले, जर त्यांनी पुन्हा बाजी मारली आणि जर पुन्हा एकदा अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत असली तर किमान काही कालावधीसाठी का असेना शेळकेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, हे नाकारता येत नाही. कारण फक्त तालुक्यातच नाही तर राज्यातील तरुणाईत शेळकेंची क्रेझ असून अनेक आमदारांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहे.
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
– मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
– उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार