Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मावळ तालुक्यात भांगरवाडी, लोणावळा येथील कु. मोनिका बाळासाहेब झरेकर हिची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदी निवड झाली आहे. मोनिकाच्या या उज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास करीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मोनिका झरेकर हिची यापूर्वी मंत्रालय कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, वजन-मापे निरीक्षक अधिकारी आणि कर व प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद अशा चार पदांसाठी निवड झाली होती. परंतु त्यानंतरही तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. यानंतर आता तिची MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड झाली आहे.
मोनिका बाळासाहेब झरेकर हिचे प्राथमिक शिक्षण ऑक्सिलियम कॉन्व्हेंट लोणावळा येथे झाले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय लोणावळा येथून मेकॅनिकल इंजिनीरिंग या विषयात तिने पदवी घेतली. त्यानंतर काही काळ एका खासगी कंपनीत काम केले. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार करून तिने परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. यानंतर जिद्धीने व चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास करीत कुटुंबाच्या साथीने तिने एमपीएससीमधून क्लास वन ची पोस्ट प्राप्त केली आहे.
- सध्या मोनिका तळेगाव दाभाडे येथे कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदासाठी दिलेल्या परीक्षेद्वारे निवड झाली आहे. मोनिकाचे वडील बाळासाहेब झरेकर हे नुकतेच नौसेना अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव झरेकर आणि नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ झरेकर यांची ती पुतणी आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गोविंदराव शिंदे यांची ती भाची आहे. तिच्या यशाचे सध्या लोणावळा आणि मूळ गावी व परिसरात कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link