व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळ्यात मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि लहान मोठे अपघात होतात. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Mumbai Pune missing link project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी यंदाचा पावसाळा अधिक आंनददायी ठरणार आहे. मावळ तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांची संख्या अधिक असते. या प्रवाशांना प्रवासासाठी मुंबई-पुणे मार्ग हा प्रमुख आहे. परंतु पावसाळ्यात या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अन्य कारणांमुळे पर्यटकांचा आनंद वाटेतच विरतो. परंतु यंदापासून ही अडचण कायमची दूर होणार आहे. याचे कारणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यंदाच्या ऑगस्ट मध्ये हे काम पूर्ण होऊन मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि लहान मोठे अपघात होतात. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, ही बाब लक्षात घेऊन मिसिंग लिंक प्रकल्प साकारण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासातील वेळ वाचेल, इंधन बचत होईल आणि प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन प्रवास अधिक सुखकर होईल.

मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम 97 टक्के पूर्ण झाले आहे. यातील शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

प्रवाशांचा वेळ वाचणार, इंधन वाचणार
1. मिसिंग लिंकमध्ये खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग समाविष्ट
2. मिसिंग लिंकमुळे द्रुतगती मार्गावरील मार्गिकेतील सध्याचे 19 किमीचे अंतर 6 किमीने कमी होऊन 13.3 किमी इतके होणार
3. मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार, सोबत इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट होणार
4. खंडाळा येथील बोरघाटीतल रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन 


dainik maval jahirat

Previous Post

गुडन्यूज : पनवेल कॉर्ड लाइन प्रस्तावाला मान्यता ; पनवेल-सोमाटणे, पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाइन प्रकल्प

Next Post

कोकणातील पर्यटकाचा मावळात खून ; गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणातून स्थानिक तरुणांनी मारलं, ९ जणांवर गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

कोकणातील पर्यटकाचा मावळात खून ; गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणातून स्थानिक तरुणांनी मारलं, ९ जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.