व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोकणातील पर्यटकाचा मावळात खून ; गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणातून स्थानिक तरुणांनी मारलं, ९ जणांवर गुन्हा दाखल

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


Dainik Maval News : वाहन वळविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात लोणावळा जवळ घडली आहे. मारहाणीत दोघेजण गंभीर जखमीही झाले आहेत. ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील एका फार्म हाऊसजवळ घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२), प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. ते पर्यटनासाठी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते.

  • पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी कमलेश व त्यांचे काही मित्र लोणावळ्यात आलेले होते. सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्यावरून पर्यटक व स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादातून हाणामारी झाली. स्थानिकांनी लोखंडी गज, दांडके, कारच्या वायपरनी पर्यटकांवर हल्ला केला. हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मनोज वरवटकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


Previous Post

पावसाळ्यात मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

Next Post

मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke demand for projects in Maval taluka at review meeting of Agriculture Department

मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.