राज्यातील कोट्यवधी नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या 48 तासांत मान्सून ( Monsoon Update ) महाराष्ट्रात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनने शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली. त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तब्बल आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर गुरूवारी मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मान्सूनने जोरदार वाटचाल केली. शनिवारी (10 जून) मान्सून पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात धडक दिली. ( monsoon to enter maharashtra in 48 hours by IMD forecast already reaches karnataka karwar )
पावस आयज कर्नाटकांतल्या कारवार मेरेन फुडें सरला.
फुडल्या 48 वरांत कर्नाटक, गोंय आनी महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी आनीक फुडें वचपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा.
– आयएमडी@NYKSkarwar @goacm pic.twitter.com/SVTx5UCUVG— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
सध्या मान्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील 48 तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
११/०६:अरबी समुद्रावरील बिपरजॉय अत्यंत तीव्र चक्री वादळ झाले:सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला चक्रीवादळ इशारा (पिवळा संदेश):
सकाळी 5.30 वा मुंबईपासून 580किमी
सौराष्ट्र-कच्छ व लगत पाकिस्तानच्या किनारपट्टीला १५/०६ दुपारी मांडवी-कराची दरम्यान ओलांडण्याची शक्यता;वारे 125-135kmph-150 kmph— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला असताना दुसरीकडे बिपोर्जॉय चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. येत्या 24 तासांत बिपोर्जॉय चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्याची शक्यता आहे. याचा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्ये जाणवू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा
– चालकाची मस्ती, टेम्पोची घाटात कुस्ती..! हाईट बॅरिकेडमधून टेम्पो घुसवण्याचा आगाऊपणा चालकाला नडला