उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक 27 जुलै 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. देशात 2 लाख 8 हजार, तर महाराष्ट्र मध्ये 14 हजारहून अधिक तर पुणे जिल्ह्यामध्ये 650 पेक्षा जास्त आणि मावळ तालुक्यात जवळपास 50 केंद्राचा समावेश यामध्ये असणार आहे. ( more than 2 lakh Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra will be inaugurate by Narendra Modi on 27th july )
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने इंदोरी, दारुंब्रे, टाकवे बू., कामशेत, कढधे इ. ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांसह उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा मावळचे तालुकाध्यक्ष तथा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली. तसेच, उद्घाटनावेळीच प्रधानमंत्री मोदी हे पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता सकाळी 11 वाजता राजस्थान मधील सिकर येथून वितरीत करणार आहेत. त्याचसोबत देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
मावळ तालुक्यातील शासनमान्य विक्रेत्यांच्या दुकानांनाच प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा दर्जा देण्यात आला असून. या केंद्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते, बी, बियाणे, औषधे आणि कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.
तसेच, माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नव नवीन तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी या केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कृषी विभागाच्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. ( more than 2 lakh Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra will be inaugurate by Narendra Modi on 27th july )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पाश्चात्य संस्कृतीतील फ्री रिलेशनशीपच्या प्रभावाने देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे – उच्च न्यायालय
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख