लोणावळा शहरामध्ये मागील महिन्यात बनवलेल्या रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. लोणावळा नगरपरिषद हद्दीतील नवीन रस्त्यांच्या दुरावस्थेला आणि शहराच्या अस्वच्छतेला नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत लोणावळा शहर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने सोमवारी (दिनांक 24 जुलै ) नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ( Movement by Maharashtra Navnirman Sena in Lonavla city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून निकृष्ठ दर्जाचे रस्ते बनविले आहे. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. हे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याला लोणावळा नगरपालिकेचे कोणतेही काम इथून पुढे देऊ नये,” अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या क्वालिटीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी व खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी मनसे कडून करण्यात आली.
अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांचा निषेध नोंदविण्यासाठी मनसे कडून प्रतीकात्मक लोणावळा नगरपरिषदेचे भ्रष्टाचाराचे चंद्रयान रस्त्यावरती उतरवण्यात आले होते. तसेच मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, मा. प्रवक्ते अमित भोसले, दिनेश कालेकर मधुर पाटणकर यांनी अंतराळवीरांची वेशभूषा साकारत आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी मनसेचे निखिल भोसले, सुनील भोंडवे, उमेश बोडके, निखिल सोमण, अभिजीत फांगसे, रोहिदास शिंदे, सुनील होजगे,सुरेश राठोड,सुनिल सावळे, अविनाश पाटील,रवी मानकर, परेश वावळे,अजिंक्य बोभाटे, प्रशांत वैद्य, गौतम रावळ, अनिल अल्हाट, राजू मुळे, योगेश कदम, निर्मल आंबेकार, अनिश शेटे, संतोष येवले यंच्यासह मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक व लोणावळेकर नागरिक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन
– ‘पसायदान विश्व दीप कृती समिती’च्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर, काय आहे ही समिती? जाणून घ्या