व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort

लोहगड किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसा स्थळात समावेश ; खासदार बारणे यांच्याकडून किल्यावरील कामाची पाहणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 18, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
MP Shrirang Barne inspects Lohagad Fort in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोेकसभा मतदारसंघात असलेल्या लोहगड किल्यावरील कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 17) पाहणी केली. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोहगड किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसा स्थळात समावेश होणार असल्याचा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी लोहगड किल्याला भेट दिली. संपूर्ण गडावर फिरुन पाहणी केली. गडावर चाललेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन टेकाळे, शिवसेनेचे शरदराव हुलावळे, राजेंद्र तरस, माजी सभापती गणेश धानीवले, अलका धानीवले, राम सावंत, चंद्रकांत बोते, अमित कुंभार, विशाल हुलावळे, सरपंच सोनाली बैवरे, उपसरपंच पंढरीनाथ विखार, सुनील हगवणे, मुन्ना मोरे, दत्ता केदारी, कमलेश शेळके, सचिन भोरडे, नितीन देशमुख, राजू गुजर आदी उपस्थित होते.

  • खासदार बारणे म्हणाले, लोहगड किल्याच्या पायथ्याशी शिवस्मारकाचे काम अर्धवट आहे. शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. किल्ले संवर्धन, सुशोभीकरण करण्याबाबत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेणार आहे. लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार लवकरत किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात लवकरच समावेश होणार आहे.

किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहे.

लोहगडासह मावळात विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले आहेत. जवळच कार्ला, भाजे लेणी आहे. त्यामुळे किल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन वाढीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गड किल्ल्यांवर येणारे शिवप्रेमी, शिवभक्त, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


Previous Post

सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा । Pavananagar News

Next Post

आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक ; वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Review meeting in connection with Ashadhi Wari 2025 In Presence Pune District Collector

आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक ; वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.