केंद्र सरकारने संसदेत अधिवेशनादरम्यान जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 सादर केले. या विधेयकाला शिवसेना पक्षाच्या बाजूने खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठींबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी वारकऱ्यांसाठी पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीचा मुद्दा मांडला. इंद्रायणी नदीचे वाढते प्रदुषण (Indrayani River Pollution) हि अत्यंत चिंतेची बाब आहे, त्याबद्दल खासदार बारणे यांनी संसदेत आवाज उठवला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत आहे. तिचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पावले उचलली जात आहेत. त्याला वेग येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. अशात केंद्र सरकारने आणलेले जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 जल प्रदूषणाला आळा घालेल, अशी आशा खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. (MP Srirang Barane raised issue of Indrayani river pollution in Parliament)
संसदेत बोलताना बारणे म्हणाले की, विहीर, नदी, नाले यापासून तर समुद्रापर्यंत जल प्रदूषण झाले आहे. ही भीषण परिस्थिती आताचे सर्वात मोठे आव्हान आहे. जलप्रदूषण ही सध्याची फार मोठी गंभीर समस्या आहे. मुळात ही समस्या केवळ एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या संदर्भात हा कायदा महत्वाचे कार्य करेल, असे बारणे म्हणाले.
अधिक वाचा –
– गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील
– बंद म्हणजे बंद..! ‘शिरे-शेटेवाडी येथील दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करा, नाहीतर..’ ग्रामसभेत ठराव
– पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी, वाचा काय आहे प्रकरण । Pune District Collector Suhas Diwase