Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत वडगाव शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ बंधारा येथे नगरपंचायत मार्फत नवीन जॅकवेल करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे जांभूळ जॅकवेल येथून काही भागात होणारा पाणीपुरवठा हा पुढील 20 ते 25 दिवस गढूळ राहील.
यापार्श्वभूमीवर वडगाव मधील सर्व नागरिकांनी सध्या येणारे पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. वडगाव नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत पूर्णपणे सजग असून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सांगितले.
तसेच, नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास नगरपंचायतीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, वडगाव नगरपंचायतीचे संस्कृती जलशुध्दीकरण केंद्र येथे मागील 10 दिवसांपासून दुरुस्तीचे काम चालू होते. येथील दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे आता संस्कृती जलशुध्दीकरण केंद्र येथे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल लवकरच जाहीर करण्यात येईल. अशीही माहिती प्रशासनाने दिलेली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात
– दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
– अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत
– मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
