Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील महिलांना आतापर्यंत सुमारे 14 कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु शासन आदेशानुसार पडताळणी व चौकशीअंती तालुक्यातील 2 हजार 607 महिला या योजनेतून अपात्र ठरल्या असल्याची माहिती मिळत आहे.
मावळ तालुक्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 96 हजार 968 अर्ज पात्र ठरले. त्यापैकी 94 हजार 361 अर्जांना मंजुरी मिळाली. गेल्या वर्षी पहिल्या फेरीत 47 हजार महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले होते. तोपर्यंत अनेक महिलांनी हा अर्ज भरला नव्हता.
परंतु, जसे इतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले तसे उर्वरित महिलांनीही योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी तसेच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर अर्ज भरणाऱ्यांचा आकडा तब्बल 96 हजार 968 वर गेला. त्यातील 94 हजार 361 अर्जांना मंजुरी मिळाली.
- नव्याने महायुती सरकार स्थापन झाल्यावर सरकारने, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्याचे जाहीर केले. त्यावेळी अनेक अपात्र महिलांच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत द्यावे लागतील काय, याची चर्चा सुरू होती. मात्र, दिलेली रक्कम परत घेणार नसल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ही धास्ती कमी झाली.
परंतु, जास्त उत्पन्न असणे, कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहन, आयकर भरणे, रेशन कार्ड नसणे अशा विविध कारणांमुळे चौकशीअंती तालुक्यातील 2607 महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्याची माहिती, प्रकल्प अधिकारी विशाल कोतागडे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा