Dainik Maval News : महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून योजनेचे पैसेही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. कॅगने याबाबत सरकारला इशारा दिला आहे. राज्याच्या तिजोरीवर भार होण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
2024 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीची सत्ता आली. मात्र यासोबतच या योजनेचे दुष्परिणामही समोर येत आहेत.
राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, अशी चिंता व्यक्त करत कॅगने सरकारला इशारा दिला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याला वर्षाला सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ऑगस्ट महिन्यात सुरु केलेल्या या योजनेत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते. यापुढे ही रक्कम 2100 रुपये करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार आणखीन वाढणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार