व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खबरदार… नायलॉन मांजा विकाल तर जेलमध्ये जाल

नायलॉन मांजामुळे राज्यात काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 11, 2025
in महाराष्ट्र
kite flying Ban on sale of nylon manja

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नायलॉन मांजामुळे राज्यात काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी सक्त कारवाई करण्यात यावी. मांजाच्या उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पेालीस उपायुक्त (उपक्रम) श्री. पठाण, छ. संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, धुळे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे, पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगांवचे अति. पोलीस अधिक्षक अशोक नकाते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नायलॉन मांजाच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्याचे सांगत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, पोस्टर्स आदींद्वारे जनजागृती करावी. मात्र यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी चांगल्या संकल्पना राबविलेल्या आहेत. त्याचा अन्य महापालिका, पोलीस आयुक्त यांनी अवलंब करावा. दुचाकीला यु कमान लावण्यातबाबत तपासून घेण्यात यावे. तसेच मांजा विक्री, उत्पादन किंवा मांजामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा.

वाहतूक पोलीसांनी नायलॉन मांजावरील कारवाईबाबत अलर्ट असावे. रस्त्यांवर आपत्कालीन पथकांची नेमणूक करावी. वेगात वाहन असताना मांजा गळ्याला लागून दुर्घटना झाल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशा सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची आणि प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार 


dainik maval jahirat

Previous Post

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधींचा भार… सरकारला इशारा ! Ladki Bahin Yojana

Next Post

HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
HSC Exam Hall Ticket 12th Board Exam Admit Card Hall Ticket available online download it

HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.