Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेण्यासाठी व भरण्यासाठी राज्यात सर्वत्र महिलांची झुंबड उडालेली असताना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मात्र कोठेही गर्दी न होता तालुक्यातील प्रत्येक महिलेला एक रुपयाही खर्च न करता या योजनेचा लाभ मिळेल, असा सुटसुटीत ‘मावळ पॅटर्न’ बनवला आहे. राज्यात सर्वत्र राबवता येईल, असा नियोजनाचा आदर्श शेळके यांनी घालून दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रांत अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा पॅटर्न बनविण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 103 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तसेच शहरांमध्ये व मोठ्या गावांमध्ये एकूण 24 ठिकाणी या योजनेची सुविधा केंद्रे सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेकडो स्वयंसेवक देखील या उपक्रमात सहभागी होऊन महिलांना आवश्यक ती मदत करणार आहेत, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana in Maval taluka applications will accept at village level )
महिलांना या योजनेच्या अर्जांचे वाटप करून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने प्रत्यक्षात अर्ज भरण्याची सुविधा सर्व महिलांना आपापल्या गावात व घराजवळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तालुक्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी झेरॉक्सपासून ते योजनेला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे महिलांना या केंद्रांवर मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आमदार शेळके म्हणाले की, ‘मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवीत आहे. आता महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. मावळातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या या योजनेतून मावळातील एकही महिला लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकारने सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत.’
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम महायुती सरकार करत आहे.या योजनेसाठी रेशनकार्ड आणि जन्माचा किंवा शाळेचा दाखला असेल तर उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) आवश्यकता नाही. त्यामुळे महिलांना कागदपत्रे मिळविण्यासाठी कोठेही धावाधाव करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले
मावळातील सुविधा केंद्रांची यादी –
» दादा-दादी पार्क, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे.
» मावळ इंद्रायणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., आमदार सुनील शेळके जनसंपर्क कार्यालयासमोर, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे.
» रिक्रिएशन हॉल, जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
» शॉप नं.०३, पारेख फोटो स्टुडिओ शेजारी , तळेगाव दाभाडे.
» शुभ लाभ बिल्डींग , म्हाळसकर वाडी पेट्रोल पंपासमोर, तळेगाव दाभाडे.
» इंद्रायणी मंगल कार्यालय, वराळे रोड, तळेगाव दाभाडे स्टेशन.
» अन्वी इंडस्ट्रीयल सर्व्हीसेस, लीलामृत हॉटेल शेजारी , माळवाडी.
» भूमिका एन्टरप्रायजेस, राऊत हाय स्ट्रीट बिल्डींग, जांबवडे फाटा, इंदोरी.
» महादेव मंदिर वलवण, लोणावळा.
» मॅकडोनल्ड कॉम्प्लेक्स मॉल, पहिला मजला, लोणावळा.
» शहा बंगलो, शितळादेवी मंदिर, पाण्याच्या टाकी शेजारी शितळादेवीनगर, भांगरवाडी लोणावळा.
» शनी मंदिर, खंडाळा.
» शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ.
» मुख्य कमानीशेजारी, श्री क्षेत्र देहु.
» पंडित जवाहरलाल नेहरु मंगल कार्यालय, मेन बाजार, देहूरोड.
» व्हीएन डेव्हलपर्स ऑफिस, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, सोमाटणे.
» निलेश गायकवाड यांचे ऑफिस जि.प.शाळेसमोर,चांदखेड.
» भैरवनाथ मंदिर, नवलाख उंब्रे.
» पद्मावती मंदिर, उर्से.
» गणेश मंदिर, पवना नगर
» शॉप नं 01, पेट्रोलपंप शेजारी, बस स्टॉप जवळ , कडधे.
» ओम साई बिल्डींग, कार्ला फाटा , कार्ला.
» ग्रामपंचायत कार्यालय, कान्हे.
» अष्टविनायक मंगल कार्यालय, टाकवे बु., पस्ताकीया प्लाझा, गणेश मंगल कार्यालय समोर, कामशेत
अधिक वाचा –
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway
– मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश
– राज्यात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या माहिती