उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार झाला असून त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील दहिसर (Dahisar) येथे एका कार्यक्रमानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. ज्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मॉरिस भाई नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. ह्याच व्यक्तीने गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबूक लाईव्ह केलं होतं, आणि फेसबूक लाईव्ह संपत असताना मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. महत्वाचे म्हणजे मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, अशी त्याची धारणा होती, अशी माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. आज एका कार्यक्रमाला घोसाळकर यांना आमंत्रित करून तिथेच त्यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला. ज्यात त्यांचा मृत्यू झालाय. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचे बोलले जातंय. महत्वाचं म्हणजे मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून स्वतःला संपवलंय.
अभिषेक घोसाळकर यांच्या अशा जाण्याने त्यांच्या जवळील मित्र, नातेवाईक आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याने आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच हॉस्पिटलच्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी जात आहेत. (Mumbai News Abhishek Ghosalkar son of former Shiv Sena UBT MLA Vinod Ghosalkar shot at in Dahisar Live Updates)
कुछ दिनों पहले महाराष्ट्र के पुलिस थाने के अंदर BJP विधायक ने गोलियां चलाई थी,
और आज Live कैमरे पर शिवसेना (UBT) के नेता Abhishek Ghosalkar पर गोलियां चलाई गयी।
ये ‘जंगलराज’ नही तो फिर क्या? pic.twitter.com/hySUBWWZPM
— Srinivas BV (@srinivasiyc) February 8, 2024
What’s happening in Mumbai ? @Dev_Fadnavis
Apparently Mauris Noronha shoots Abhishek Ghosalkar in his own office. pic.twitter.com/bNn9KBhWHI
— Hemant Kaliwada (@kaliwada) February 8, 2024
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या विमानतळाबाबत खासदार बारणेंनी संसदेत उठवला आवाज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे मराठीत उत्तर
– पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली, ‘हे’ कर्तव्यदक्ष अधिकारी बनले पुण्याचे नवे कलेक्टर । New District Collector Pune
– लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan