मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कुणेनामा पुल (खंडाळा ) इथे काही दिवसांपूर्वी केमिकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला होता. या अपघातावेळी पुलाखालून जात असलेले राजमाची येथील आदिवासी कुटुंबातील तीन जण गंभीररित्या जखमी होऊन मृत पावले. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दुःखाचे आभाळ कोसळलेल्या राजमाची येथील वरे कुटुंबीयांची आमदार सुनिल शेळके यांनी राजमाची इथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कुणे गावाजवळ मंगळवार, दिनांक 13 जून रोजी हा अपघात घडला होता. यात सविता कैलास वरे (वय 34 वर्ष) त्यांचा मुलगा कुशल कैलास वरे ( वय 8 वर्ष ) आणि त्यांचा भाचा रितेश पोशिरे ( वय 18 वर्ष ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
“दुर्गम भागातील राजमाची हे मावळ तालुक्याचे शेवटचे टोक. येथील नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने लोणावळा शहराच्या परिसरात यावे लागते. सर्वसामान्य कुटुंबातील निष्पाप जीवांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला, ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. संपूर्ण वरे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास यावेळी आमदार शेळकेंनी वरे कुटुंबाला दिला. ( mumbai pune expressway tanker accident mla sunil shelke consoled vare family from rajmachi )
अधिक वाचा –
– कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, माळवाडी येथील घटना
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच
– किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासाबाबत मोठी अपडेट! पोलिस आयुक्तांकडून आणखी एका विशेष पथकाची स्थापना