मुंबई ते पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात. मात्र यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा फटका बसतो. वेळ वाया जातो. मुंबई पुणे प्रवास करत असताना वाहनांना लोणावळा खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. लोणावळा, खंडाला ही पर्यटन स्थळे असल्याने शनिवारी, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तेव्हा तर वाहतूक कोंडी कित्येक तास फुटत नाही. प्रवाशांचे होणारे हाल, अनावश्यक वाहतूक कोंडी आणि वेळेचा होणारा अपव्यय, हे पाहता सरकारने मुंबई – पुणे मार्गावर मिसिंग लिंक हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुंबई – पुणे मार्गावर अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. लोणावळा घाटातील वाहतूक कोंडी फुटावी त्यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कूसगाव पर्यंत दुहेरी बोगदा तयार केला जात आहे. दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गीकेचे बोगदे तयार होणार आहेत. त्यातील एका बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर एवढी आहे. तसेच एका बोगद्याची लांबी 1.67 किलोमीटर एवढी आहे. विशेष बाब अशी की, या दोन्ही बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
बोगद्यांचे 98 टक्के इतके काम पूर्ण झाले असून आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत भागातील यंत्रणेची कामे बाकी आहेत. ही कामे जलद गतीने सुरू आहेत. विशेष म्हणजे या बोगद्यांची जोडणी मुंबई पुणे एक्सप्रेस वेला देण्यासाठी खोपोलीच्या दिशेने दोन पुलांची उभारणी केली जात आहे. यातील 1.8 किलोमीटर लांबीचा पूल पूर्ण झालाय, तर 950 मीटर लांबीच्या केबल स्टेड प्रकारातील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या पुलाचे 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत राहिलेले काम पूर्ण होणार आहे.
बोगद्याचे आणि पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होणार असा दावा करण्यात आला आहे. ( mumbai to pune travel time cut by 25 minutes by missing link project will complete before december )
अधिक वाचा –
– मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News