Dainik Maval News : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केलेला दिवस बुधवारी (दि. ८ ) उजाडला. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. मावळातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगर परिषदा आणि वडगाव मावळ नगरपंचायत करीता प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. अन् आरक्षण सोडतीच्या अवघ्या चोवीस तासांत प्रत्येक प्रभागात भावी नगरसेवकांचे पीक आल्याचे दिसून आले.
खरे तर निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव, या उत्सवात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. मग ते प्रत्यक्ष निवडणुक लढवून असो किंवा मतदान करणे स्वरूपात असो. यातील मतदार वगळता प्रत्यक्ष निवडणुक लढविणारे मंडळीना अधिक काम करावे लागते. आता निवडणुका म्हटले की इच्छुक उमेदवार पुढे येतातच. परंतु यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल अडीच तीन वर्षे लांबल्याने इच्छुकांची संख्याही वाढली. परंतु वेळोवेळी संख्या वाढून निवडणूक लांबल्याने ती कमीही झाली. परंतु आता जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर इच्छुकांचे पीक आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
बुधवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक शहरातील प्रभागांत रातोरात भावी नगरसेवकांचे पीक आले आहे. 24 तासाच्या आत प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपले बॅनर, पोस्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरूवात केली असून व्हॉट्सअपवर शेअरिंग वाढले आहे. येत्या एक दोन दिवसांत या इच्छुकांचे जनसंपर्क कार्यालयही नजरेस येतील आणि खऱ्या अर्थाने निवडणुक रंगात येतील.
इच्छुक असणे यात गैर नाही, परंतु केवळ निवडणूक लढवायची अन् कोणताही विचार, ध्येय उराशी बाळगायचा नाही, ही गोष्ट नक्कीच गैर आहे. त्यामुळे नागरिकांनी भावींतून योग्य तो उमेदवार निवडण्याच्या अटी तयार करायला सुरूवात करायला हवी, असं आपण म्हणू शकतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर

