नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा शनिवारी निकाल लागला. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. ( Nagpur District Bank Scam Congress leader Sunil Kedar MLA seat cancelled )
सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा शनिवारी रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. तेव्हा छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले. सुनील केदार यांना सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण
– ‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना
– भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती