कृषी पायाभूत निधी योजना (AIF) , प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग(PMFME) योजना व कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्याकरीता गुरूवारी (दिनांक 31 ऑगस्ट 2023) रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, वडगाव (ता. मावळ) येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ( National Agriculture Infra Financing Facility AIF Scheme )
केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (आत्मनिर्भर भारत पॅकेज) योजने अंतर्गत प्रकल्पांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तरवृद्धीकरीता पात्र प्रकल्पांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प आराखड्याच्या किंमतीच्या किमान 35 टक्के अनुदान देण्यात येत आहे. बँक कर्जाच्या व्याजदरात 3 टक्के पर्यंत सुट देण्यात आलेली आहे.
या प्रक्रिया उद्योगांचे वैयक्तिक कृषी प्रक्रिया उद्योजक,महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत असलेले महिला बचत गट, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, प्रगतशील शेतकरी, कृषी पदवीधर, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे अधिकारी, नागरी सेवा केंद्र चालकांचे ऑनलाईन अर्ज, प्रस्ताव तयार करणे, बँक कर्ज मंजुरी तसेच आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी तालुक्यातील सर्व अग्रणी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून बँक स्तरावर असलेल्या त्रुटींचा पूर्तता संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी केले आहे. ( National Agriculture Infra Financing Facility AIF Scheme )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात शिवसेना उ.बा.ठा. पक्षाची नव्याने बांधणी; गट आणि गण स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, पाहा यादी
– महादेव जानकरांचा ‘स्वबळाचा’ नारा, लोकसभेच्या सर्व जागा लढणार, भाजपवर घणाघात, स्वतःसाठी मनात बारामती फिक्स?
– शेतकऱ्यांनो..! खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा; जाणून घ्या स्पर्धेचे नियम, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि बक्षिसाची रक्कम