देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांचा वाढदिवस ( Birthday ) तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र प्रदेश भाजपाने ( Maharashtra BJP ) मंडल स्तरावर आयोजित करण्याल सांगितलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( Rashtraneta to Rashtrapita ) या अभियानाचा शुभारंभ वडगाव शहर भाजपाच्या वतीने रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन करण्यात आला. ( Campaign Started By Distributing Fruits To Patients In Vadgaon Maval )
तसेच वडगाव शहरातील आदिवासी वस्तीवरील अंगणवाडी केंद्र आणि श्री ज्ञानेश्वरी सेवा संघाच्या जेष्ठ नागरिकांना देखील फळांचे वाटप करण्यात आले. वडगावातील मनिषा हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, मावळ हॉस्पिटल, विघ्नहर्ता हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल, डॉ. कुंदन बाफना यांचे क्लिनिक आणि डॉ. गौरव धंदुके यांचे क्लिनिक येथे तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील आदिवासी वस्तीवरील अंगणवाडी आणि कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळे वाटण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे, संघटन मंत्री किरण भिलारे, सरचिटणीस कल्पेश भोंडवे, मा सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, मनोज गवारे, सचिन कराळे, महेंद्र म्हाळसकर, सोमनाथ वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ( National Leader To National Father Campaign Started By Distributing Fruits To Patients In Vadgaon Maval )
अधिक वाचा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत शहर येथे मिठाई वाटप
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत शहर येथे मिठाई वाटप