Dainik Maval News : नवरात्रीचा काळ आणि रविवार, हे सूत्र जुळून आल्याने काल, रविवारी (दि. 6 ऑक्टोबर) कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दाटली होती. संपूर्ण गडावर जिकडे तिकडे माणसांची दाटी झाल्याने गडावर भाविकांचा महापूर आल्याचे भासत होते. यंदाच्या नवरात्रोत्सवातील गर्दीचा उच्चांक रविवारी पाहायला मिळाला. एकाचवेळी एवढी माणसे गडावर आल्याने प्रशासनावर आणि मंदिर व्यवस्थापनावर काहीसा ताण आला होता.
रविवारी घटाची चौथी माळ होती, सोबत रविवाही होती. त्यामुळे अगदी मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर भागातून भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला येथे आले होते. गडाचा माथा आणि पायथा दोन्ही भाग माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. तर देवीच्या दर्शनासाठी भाविकांना चार ते पाच तास दर्शनरांगेत थांबावे लागत होते. दुपारपासून ही गर्दी वाढत गेल्याने पायऱ्यांवरून हळूहळू भाविक मंदिराकडे सरकत होते.
एकाचवेळी एवढे भाविक आल्याने वाहनांची संख्या वाढून कार्ला फाटा ते वेहेरगाव मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. तर कार्ला फाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यंदा रविवारी गर्दींचा नवा उच्चांक गाठल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत जवळपास लाखभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi
– मोठी बातमी ! राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी ; पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना होणार
– युनेस्कोच्या पथकाची लोहगड किल्ल्याला भेट, स्थानिक ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी साधला संवाद । Lohgad Fort