व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वंदन दुर्गांना । “योगसाधनेतून घडली आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक” : मनाली देव यांचा प्रेरणादायी ‘जीवनयोग’ । International Yoga Instructor Manali Dev

लहानपणीच तिला आईनं योग वर्गाला घातलं. मल्लखांब, पोहणे, स्केटिंग, बॅडमिंटन या खेळातही तिनं कौशल्य मिळवलं. पण योगासनं शिकणं तिला फार आवडू लागलं.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 2, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
International Yoga Instructor Manali Dev

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : लहानपणीच तिला आईनं योग वर्गाला घातलं. मल्लखांब, पोहणे, स्केटिंग, बॅडमिंटन या खेळातही तिनं कौशल्य मिळवलं. पण योगासनं शिकणं तिला फार आवडू लागलं. शालेय जीवनात योगासनं आणि मल्लखांबच्या अनेक स्पर्धा तिनं गाजवल्या. पुढं, वाणिज्य शाखेची पदवी तसंच सॉफ्टवेअरमधील पदविका पूर्ण केली. तरीही योगसाधनेला जराही बाजूला न ठेवता योग क्षेत्रातील पदवीही मिळवली आणि निराळी वाट निवडून तिनं योग क्षेत्रात काम करायचं ठरवलं. एका शाळेत योगप्रशिक्षक म्हणून तिचा प्रवास सुरु झाला आणि आज ती पुण्यातील ख्यातनाम आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक आहे. अशी ही महिलांना सक्षम व्हा असा संदेश देणारी ‘दुर्गा’ म्हणजे आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक Mind and Body Yoga Institute च्या संचालिका मनाली देव (वय ४५). गेल्या २० वर्षात त्यांनी हजारो विद्यार्थी आणि योगप्रशिक्षक घडवलेत. ( International Yoga Instructor Manali Dev )

मनालीताई चिंचवडच्या असून त्या सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्याचं शालेय शिक्षण चिंचवडच्या गीतामंदिर शाळा व एम. एस. एस. हायस्कूलमध्ये झाले. अभ्यासाबरोबरीनं इतर काही कलाकौशल्य आत्मसात असलं पाहिजे म्हणून मनालीताईंच्या आईनं त्यांना इयत्ता दुसरीत असतानाच योगासन वर्गाला घातलं. सोबतच मल्लखांब, स्केटिंग शिकण्यासाठी सुट्टीत आई छोट्याशा मनालीला घेऊन चिंचवडहून मुंबईला जात असे. या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळं मनालीला योग आणि मल्लखांब फार आवडू लागला, मन लावून ती शिकू लागली.

शाळेत असताना बारावीपर्यंत योगासनं आणि मल्लखांबच्या अनेक स्पर्धांमध्ये तिनं मोठं यश मिळवलं. मनाली मल्लखांबची सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळाडू आहे. शाळेच्या कबड्डी-खोखो’च्या संघातही तिची निवड व्हायची. विविध खेळांमध्ये मनालीनं आत्मसात केलेलं कौशल्य म्हणजेच तिचा क्रीडाक्षेत्रातही काही करण्याचा पायाच पक्का होत होता.

पुढं, मनालीनं मॉडर्न महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. M. COM पूर्ण केले. Advance Diploma in Software System ही पदविकाही पूर्ण केली. परंतु, योगसाधनेचा ध्यास मनालीला योगक्षेत्राकडे घेऊन गेला. ताईंनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून योग आयुर्वेद ही पदवी आणि योग प्रशिक्षणाची पदविका पूर्ण केली आणि घडल्या एक आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक.

  • सन २००२ मध्ये मनालीताईंनी चिंचवडला स्वतःचं प्रशिक्षण केंद्र केलं आणि याच वर्षी ताईंना निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत क्रीडाकुल विभागात योग प्रशिक्षकाची पहिली नोकरी मिळाली. तिथं मिळणारं पाचशे रुपयांचं मानधनही ताईंसाठी खूप मोठं समधानाचं आणि आनंदाचं होतं. कारण ही मनालीताईंच्या करिअरची यशस्वी सुरुवात होती आणि क्रीडाकुलमध्ये त्यांनी ११ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवले.

सन २००५ मध्ये ताई निगडी-प्राधिकरणातील किड्स वर्ल्ड शाळेत योगप्रशिक्षक म्हणून रुजू झाल्या. तिथेही त्यांनी अनेक खेळाडू तयार केले. शरीराबरोबरच मनाची सुदृढता’ हा ताईंच्या प्रशिक्षणाचा गाभा असल्याने त्यांच्या चिंचवडमधील योग वर्गालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल मनालीताईंना महासाधू मोरया गोसावी ट्रस्टकडून तसेच इतरही अनेक संस्थांकडून गौरविण्यात आले.

सन २००८ मध्ये मनालीताईंचा विवाह झाला व त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्यांचे पती ऍड. अमोद देव यांनी ताईंचे योग क्षेत्रातील सुंदर काम आणखी उचलून धरले आणि जानेवारी २००९ मध्ये पुण्यात Mind and Body Yoga Institute ची स्थापना केली. घरातच सुरु झालेल्या संस्थेच्या योग वर्गाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

तंदुरुस्तीसाठी योग प्रशिक्षण, योगा थेरपी यासह power yoga, hammock yoga, Chair yoga, Rythmic yoga, Artistic yoga असे नवनवीन योग प्रकारांचे प्रशिक्षण ताईंनी आपल्या संस्थेत सुरु केले. आपल्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत ताईंनी असंख्य विद्यार्थी घडवले आणि ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. योग प्रशिक्षक पदविका अभ्यासक्रम ताईंनी सुरु केला आणि त्यातून अनेक योग प्रशिक्षक तयार झाले आहेत. सध्या ताईंकडे २२ योग प्रशिक्षक कार्यरत आहेत. आपल्या संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राबरोबरच संस्था शाळा, महाविद्यालये, बँक, कंपन्या याठिकाणी योग प्रशिक्षण देत आहे.

समाजिक जाणिवेनं दिव्यांग विद्यार्थ्यांनाही ताईंनी योगासने शिकवली आहेत. Asia Book of Records, India Book of Records, World Young Achiever Book of Records या विक्रमांमध्ये मनालीताईंच्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यांचा मुलगा आयुषही आईप्रमाणे योगसाधना करत असून Mother-Child yoga असाही योगासनांचा विक्रम या मायलेकानं केला आहे. योग क्षेत्रातील या भरीव कामगिरीसाठी ताईंना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ताईंनी ‘yoga for kids’, ‘किप फीट’, ‘स्पर्धात्मक योगासने’ ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पुढील काळात संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याबरोबरच मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण व योगा या विषयात काम करण्याचे ताईंचा मानस आहे.

मनालीताई म्हणतात… (International Yoga Instructor Manali Dev)
“आपल्याला दररोज तंदुरुस्त राहायचं असेल तर दररोज स्वतःसाठी वेळ काढून योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा करणं महत्वाचं आहे. तेव्हाच धावपळीच्या जीवनातील ताणतणाव कमी होतील व शरीर आणि मनही निरोगी राहील. मुली आणि महिलांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, मेकअप करुन आपण थोडावेळ छान दिसू. परंतु त्यासोबतच योगाभ्यास करुन आपण अंतर्बाह्य सुंदर राहणार आहोत. सर्वांनीच दररोज त्रिकोणासन धनुरासन, भद्रासन, सर्वांगासन व प्राणायाम एवढं केलं तरी माणूस सक्षम व्हायला मदत होते. करिअरसाठी आता आरोग्याशी निगडीत असलेल्या क्षेत्रात अनेक संधी आहेत, या वाटा तरुणांनी चोखाळल्या पाहिजेत.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023

1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी


Previous Post

कार्ला गडावरील एकविरादेवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ; अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी विकासकामांचे भूमिपूजन । Karla News

Next Post

टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bail Pola Festival Maval

टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
Provide funds to solve problems in Dehu Road Cantonment Board MP Shrirang Barne demand to Defense Department

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

March 21, 2026
Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.