Dainik Maval News : मावळ तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणतीही युती केली जाणार नसल्याची ठाम भूमिका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी रविवारी (दि.१८) मांडली. तळेगाव दाभाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच पुढे बोलताना राष्ट्रवादीशी युतीबाबत कोणतीही चर्चा अथवा बोलणी झालेली नसून कुठलाही प्रस्ताव देखील दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपसोबत युती करून चूक झाली, असे आमदार सुनील शेळके यांनी जाहीरपणे म्हटले होते, याचा उल्लेख करत भेगडे यांनी राष्ट्रवादीसोबत पुन्हा युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठामपणे सांगितले.
भाजपाने या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही भेगडे यांनी दिली. त्यानुसार शिवसेना पक्षाला पंचायत समितीच्या टाकवे गणाची जागा दिली असून खडकाळे गणात आरपीआयचा उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही भेगडे यांनी जाहीर केले.
भाजपाचे अधिकृत उमेदवार
पंचायत समिती – इंदोरी गणातून श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे, वराळे गणातून रवींद्र निवृत्ती शेटे, चांदखेड गणातून सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले, सोमाटणे गणातून बाळासाहेब नथू पारखी, काले गणातून सीमाताई मुकुंदराव ठाकर, कार्ला गणातून रंजनाताई सुरेश गायकवाड, टाकवे गणातून (शिवसेना) अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उरलेल्या उमेदवारांची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार असल्याची माहिती देताना, मंगळवारी वडगाव मावळ येथे भव्य मिरवणूक काढून महायुतीचे सर्व १५ उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला
