Dainik Maval News : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आणि लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. याकरिता पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
आमदार सुनील शेळके आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, निवडणुकांसाठी संबंधित आरक्षण निश्चित झाले असून, पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज स्थानिक अध्यक्षांकडे जमा करावेत.
कुठे अर्ज जमा करावेत?
लोणावळा : उमेदवारांनी आपले अर्ज रवि दत्तात्रय पोटफोडे, अध्यक्ष लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे जमा करावेत.
वडगाव : वडगाव नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज प्रविण ढोरे, अध्यक्ष वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे स्वीकारले जाणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती
रूपेश घोजगे – अध्यक्ष, आंदर मावळ,
भरत भोते – अध्यक्ष, पवन मावळ (पूर्व विभाग),
लाला गोणते – अध्यक्ष, पवन मावळ (पश्चिम विभाग),
साईनाथ गायकवाड – अध्यक्ष, नाणे मावळ,
निलेश दाभाडे – अध्यक्ष, कामशेत शहर,
दिनेश चव्हाण – अध्यक्ष, इंदोरी शहर
वरील अध्यक्षांकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यावेत व अर्ज पूर्ण भरून संबंधित अध्यक्षांकडे जमा करावेत.
दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी यापूर्वीच इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागविले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ८३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके आणि पक्षाते तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आमदार सुनील शेळके यांच्याकडून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर
– पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजितदादा तळेगावातील कार्यक्रमापासून चार हात दूर? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, जाणून घ्या सविस्तर
– आस्मानी संकटाची चाहूल… मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka



