व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुनिता येवले यांना उमेदवारी जाहीर करत आमदार सुनील शेळके यांनी ‘एका दगडात मारले दोन पक्षी’ – वाचा सविस्तर

मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 26, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke announces candidacy of Sunita Manoj Yewle from Maval Panchayat Samiti Chandkhed Ga

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव येथे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी एकमेकांना पुरक विधाने करीत संभाव्य युतीची चर्चा सुरू केली. परंतु पडद्यामागे दोन्ही पक्षांच्या स्वबळाच्या हालचाली सुरू असलेल्या दिसत आहेत. अशात शनिवारी एका कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती मावळकरिता पहिला उमेदवार जाहीर केला, आणि एकाच दगडात दोन पक्षी मारले.

शनिवारी ( दि. 25 ) चांदखेड येथे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत असताना आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समितीकरिता मा. सरपंच मनोज येवले यांच्या पत्नी सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ पंचायत समितीकरिता पहिला उमेदवार जाहीर करीत असल्याचे सांगत आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करीत असतानाच आमदार शेळके यांनी आणखीक एक गोष्ट साध्य केल्याचे बोलले जात आहे.

मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. यात यंदाचे पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता आरक्षित आहे. तसेच चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रि करिता आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यासोबत आमदार सुनील शेळके यांनी सभापती पदाचाही उमेदवार जाहीर केल्याचे बोलले जात आहे. सुनिता येवले या पंचायत समिती सदस्य होण्यासोबत पंचायत समितीच्या सभापती देखील होतील, अशी चर्चा सुरू आहे. यासोबत महायुतीची चर्चा सुरू असताना आमदार शेळके यांनी ही उमेदवारी जाहीर केल्याने आता मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिल, हेही एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आमदार सुनील शेळके यांच्याकडून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर
– पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजितदादा तळेगावातील कार्यक्रमापासून चार हात दूर? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, जाणून घ्या सविस्तर
– आस्मानी संकटाची चाहूल… मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! आमदार सुनील शेळके यांच्याकडून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर

Next Post

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी ; लोणावळा, वडगावसह जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मागविले अर्ज

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी ; लोणावळा, वडगावसह जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मागविले अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.