राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज (मंगळवार, दि. 12 डिसेंबर) समारोप होता. तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास करुन ही संघर्ष यात्रा नागपूर येथे पोहोचली. समारोप सभेनंतर ह्या यात्रेची सांगता झाली. परंतू, रोहित पवार यांनी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी तसेच सामान्यांची निवेदने समजून घेण्यासाठी अनेकदा मागणी करुनही सरकारकडून कोणतेही प्रतिनिधी तिथे गेले नाही. त्यामुळे रोहित पवारांनी इशारा देत अखेर विधानभवनाकडे कूच केली. यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. यावेळी झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी रोहित पवारांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रोहित पवार यांनी समारोप सभेतच जर सरकारकडून कोणताही प्रतिनिधी आपणे म्हणणे ऐकण्यास आणि नागरिकांची निवेदने समजून घेण्यासाठी आला नाही, तर विधानभवनावर जाण्याचा इशारा दिला होता. अखेर सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून न आल्याने रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी विधानभवनाचा रस्ता धरला. यावेळी आंदोलक बॅरिकेट तोडून विधानभवनाकडे सरकत होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैणात केला होता. तसेच, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि नियमाचा भंग केल्यामुळे रोहित पवार यांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ( NCP Yuva Sangharsh Yatra Rohit Pawar detained by police Nagpur Winter Session )
राज्यातील युवकांच्या , शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी युवा संघर्ष यात्रेला सरकार घाबरलं आहे.
रोहित दादा पवार आणि सहकाऱ्यांना पोलिसी बळाचा वापर करून अटक करण्यात आली.
राज्य सरकार चा धिक्कार असो…… pic.twitter.com/L3y9SDlzpM
— SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU ???????? (@Sundarspeak57) December 12, 2023
राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध!#लढू_आणि_जिंकू #YuvaSangharshYatra pic.twitter.com/tvyVhmGBDL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2023
अधिक वाचा –
– तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन
– IPS सत्यसाई कार्तिक यांची धडाकेबाज कारवाई! कुसगावातील जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 7 जण ताब्यात
– काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन