Dainik Maval News : मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, मावळभूषण, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (दि. 30 जून) रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
कृष्णराव भेगडे यांच्या निधनाबद्दल प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर रमेश जाधव गुरुजी (तळेगाव दाभाडे) यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कृष्ण मेघांची छाया हरपली…” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रमेश जाधव यांनी स्व. कृष्णराव भेगडे यांचे अनेक फोटो काढले आहेत, जे त्यांनी दैनिक मावळच्या वाचकांसाठी शेअर केले आहेत.
- शिक्षणमहर्षी, मावळ भूषण आमदार कृष्णरावजी भेगडे हे तळेगाव दाभाडे येथील नू.म.वि.प्र. मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी त्यांच्या संस्थेत सन १९७२ – ७३ या शैक्षणिक वर्षात कलाशिक्षक म्हणून काम करत असताना जवळपास ३०-३१ वर्ष मला व माझ्या मूलांना चित्रसेन व देविदास यांना साहेबांचे विविध फोटो काढण्याचे भाग्य लाभले. आम्ही त्यांचे फॅमिली फोटोग्राफर होतो, असे रमेश जाधव गुरुजी यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले.




पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे कन्या राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के आणि नातवंडे असा परिवार आहे. कृष्णराव भेगडे यांच्या पार्थिवावर मंगळवारी, सकाळी ११ वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval