Dainik Maval News : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पवना नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. मामुर्डी ते सांगवडे व हिंजवडीतील नागरिकांसाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे. या भागातील नागरिकांना या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या मामुर्डीहून हिंजवडी, सांगवडे तसेच मावळ तालुक्यात जाण्याकरिता लोखंडी पूल अस्तित्वात आहे. हा पूल अतिशय लहान आहे. एक लहान चारचाकी वाहन जात असल्यास दुचाकी देखील जाऊ शकत नाही, इतका अरुंद पूल आहे.
सदर पुलाचे आयुर्मान संपले असून यावरून वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील अनेक चारचाकी वाहनचालक जिवाचा धोका पत्करुन यावरून वाहने नेत आहेत.
- दरम्यान महापालिका प्रशासनाने या पुलाला पर्याय म्हणून नव्याने याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता दोन निविदा प्राप्त झाल्या असून, मेसर्स. ए.आर. कन्ट्रक्शन या ठेकेदराची 14 लाख 52 हजार 730 रुपये रॉयल्टी चार्जेस व 8 लाख 88 हजार 492 रुपये मटेरियल टेस्टिंग चार्जेससह एकूण 36 कोटी 66 लाख 10 हजार 37 रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली आहे.
याठिकाणच्या जुन्या लोखंडी पुलावरून जिवाचा धोका पत्करून होणारी वाहतूक लक्षात घेता याठिकाणी 36 कोटी 66 लाख रुपये खर्चुन नव्याने पुलाची उभारणी केली जाणार आहे. या पुलाचे काम ठेकेदाराला 12 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड