Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( maval taluka ) विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके ( mla sunil shelke ) यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाण पूल, खंडाळा तलावाजवळील नागरिकांच्या घराचा मुद्दा अशा अनेक प्रलंबित प्रश्वांबाबत ही आढावा बैठक पार पडली.
- लोणावळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण ( Bhangarwadi railway flyover Lonavala ) पुलाबाबत सदर बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या बैठकीनुसार दहा मार्चपूर्वी काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच, मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्नावर तोडगा काढून येत्या 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन व इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच लोणावळा शहरातील खंडाळा तलावा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठीचा सर्वे एका आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला. तसेच खंडाळा येथील शाळेची उर्वरीत रक्कम भरण्याबाबत भू-संपादन अधिकारी यांनी आठ दिवसांत व्हॅल्युएशन करून नगरपरिषदेला कळवण्याचे आदेश दिले.
- लोणावळा शहरातील भोंडे हायस्कूल यांना नगर परिषदेची शाळा सामंजस्य करार करून भाडेतत्त्वावर देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. तसेच अंतर्गत नूतनीकरण शाळेने करावे आणि लोणावळ्यातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सदर शाळेत विज्ञान विषयक शिक्षण द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
देहू नगर पंचायत हद्दीत गायरान जागेबाबत देहू नगर पंचायतीने घन कचरा व्यवस्थापन, नगर पंचायत इमारत, क्रीडांगण आणि रुग्णालय यासाठी लागणारी जागा, याबाबतचा प्रस्तावर लवकर तयार करून सादर करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनास जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासह तळेगाव दाभाडे शहरातील प्रलंबित शासकीय वसतीगृहाच्या जागेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News