Dainik Maval News : वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी बुधवारी (दि.22) शहर भाजपाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नूतन कार्यकारिणीमध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसोबत युवा चेहऱ्यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. शहर कार्यकारिणीसह विविध आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नावाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, अरविंद पिंगळे, मारुतराव चव्हाण, दिपक बवरे, नारायण ढोरे, सोमनाथ काळे, नाथा घुले, सुधाकर ढोरे यांसह माजी नगरसेवक शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे, भूषण मुथा, श्रीधर चव्हाण उपस्थित होते.
- नवनियुक्त कार्यकारिणीत संभाजी म्हाळसकर (अध्यक्ष), दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण (उपाध्यक्ष), कल्पेश भोंडवे, रवींद्र काकडे (सरचिटणीस), प्रसाद पिंगळे (संघटन मंत्री), मकरंद बवरे (कोषाध्यक्ष), शेखर वहिले, श्रीधर चव्हाण, संतोष म्हाळसकर (संघटक), प्रसिद्धी प्रमुख (निखिल तारू) यांचा समावेश असून कार्यकारिणी सदस्य म्हणून शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, रमेश ढोरे, भूषण मुथा, संतोष म्हाळसकर, शरद मोरे, किरण म्हाळसकर, शंकर भोंडवे, रवींद्र म्हाळसकर, दीपक कुडे, संतोष भिलारे यांचा समावेश आहे
वडगाव शहर भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीत अतीश ढोरे (अध्यक्ष भाजयुमो) जय भिलारे (उपाध्यक्ष) रोहित निकम (सरचिटणीस) कुलदीप ढोरे (संघटन मंत्री) सागर भिलारे, विकी म्हाळसकर (प्रसिद्धीप्रमुख) प्रवीण ढोरे (चिटणीस) गणेश भिलारे (खजिनदार) मंदार काकडे (सहखजिनदार) संतोष भालेराव (संघटक) यांता समावेश असून कार्यकारीणी सदस्य म्हणून प्रतीक काळे, अभिषेक चव्हाण, रोहन ढोरे, मयूर चांदेकर, ओमप्रकाश देशमुख, प्रीतम ढोरे यांचा सामवेश आगे.
यासह अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी नितीन ओव्हाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी महेश निकम, भाजपा किसान मोर्चा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पगडे, क्रीडा आघाडी अध्यक्षपदी अमोल ठोंबरे व विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी युवराज म्हाळसकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे