मावळ तालुक्यातील कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र ( Primary Health Centre ) येथे निवासी डॉक्टर नसल्याने परिसरातीलच एका भगिनीच्या नवजात अर्भकाचा मृत्यू ( Newborn Infant Death ) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कामशेत शहर ( Kamshet ) गावठाणमध्ये राहणारी एक गरोदर महिला प्रसुती वेदना सुरु झाल्याने रात्री उशीरा तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, या केंद्रावर रात्री निवासी डॉक्टर ( Resident Doctor ) उपलब्ध नव्हते.
रात्री दहाच्या सुमारास रुग्णालयात महिलेला आणण्यात आले. त्यावेळी रात्रीच्या वेळेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले डॉ किरण जाधव हे कोणत्याही सुचनेशिवाय गैरहजर होते. त्यामुळे तिथून या महिलेला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिच्यावर सीझर करण्यात आले. परंतू, या सर्व प्रकरणात महिलेची प्रचंड हेळसांड झाली आणि नवजात अर्भक दगावले. ( Newborn Infant Death In Kamshet )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रकरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गलथान कारभार समोर आला असून खडकाळे (कामशेत) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ विधानसभाचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी दोषीवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच प्रथम दर्शनी दोषी डॉक्टर असलेले किरण जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ( Newborn Infant Death Due To Lack Of Resident Doctor At Kamshet Primary Health Centre )
अधिक वाचा –
आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील शिक्षकाला ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर
साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ वर्णी, निवड बिनविरोध