Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम पार पडला.
हे अभियान आरोग्य, स्वच्छता जागरूकता, फिटनेस जागरूकता तसेच तरुण मुलींना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने घेण्यात आले. हे सत्र संपूर्णपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे प्रायोजित केले गेले होते.
- या प्रसंगी तळेगाव एनआयएमईआर वैदयकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सेवा विभागातील डॉ. अश्विनी विजय भेळे, एमबीबीएस, एमडी-शरीरशास्त्र तसेच डॉ. श्यामली कुलकर्णी सहाय्यक प्राध्यापिका, एमआयटी, एमएईईआर पुणेचे फिजिओथेरपी कॉलेज तळेगाव दाभाडे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व, मासिक पाळी, शरीराची ऊर्जा, हार्मोनल संतुलन , निरोगी पौष्टीक आहार आदी बाबींविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या उपक्रमात शंभर हुन अधिक विद्यार्थिनींनी सहभाग दर्शवला. अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. संपली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. तद्प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अश्विनी शिंदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. सारिका एन. पाटील यांनी केली. अभियानाची माहिती प्रा. सिमा महाळुंगकर यांनी दिली. महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख डॉ. रोहिणी हंचाटे यांनी आभारप्रदर्शन केले तर प्रा. आरती बिंदू, प्रा.भरती धोते , प्रा.धनश्री कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News