मावळ तालुक्यातील वराळे-आंबी आणि तळेगाव-एमआयडीसीला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील आंबी येथील नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दिनांक 12 डिसेंबर ) जलसमाधी आंदोलन करण्यात आले. ( Nitin Marathe Jalasamadhi Protest For Bridge On Indrayani River Near Ambi Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीच्या थंड पाण्यात तब्बल चार तास कुडकुडत उभे राहत आंदोलकांनी आंदोलन केले. अखेर इंद्रायणी नदीवरील आंबी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आणि हलकी वाहने, दुचाकीसाठी रस्ता येत्या 10 दिवसांत वाहतुकीसाठी खुला करू, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंबी पुलाची व्यथा…
जुना पूल कोसळल्यानंतर वडगाव मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू असलेले पुलाचे पहिल्या टप्प्यातील 80 टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ 2- टक्के काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे. जवळपास 8 ते 9 गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पूल बंद असल्यामुळे एमआयडीसीतील कामगार यांसह स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अधिक वाचा –
– ‘अस्सल’ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद, एका दिवसात सुमारे 10 टन तांदळाची विक्री
– युवासेना मावळ तालुका प्रमुखपदी विशाल हुलावळे यांची निवड
– भीषण अपघात! मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर विद्यार्थ्यांची बस पलटली, अनेकजण जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु