Dainik Maval News : नाताळ आणि त्यानंतर थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला आलेला विकेंड या सलग सुट्ट्यांमुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी शनिवार, रविवार व मंगळवार या तीनही दिवशी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी लोणावळ्यात नाताळ आणि थर्टी फर्स्टला मोठी गर्दी होत असते. सलग सुट्ट्यांमुळे घाटांमधील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात येते. यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बाराच्या नंतर प्रवास करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
त्यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, चालकांचा वेळ वाचेल. तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही पवना धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करून त्या त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘अर्थशास्त्री’ हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार
– वाहनांचा अतिवेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेततोय… द्रुतगती मार्गावरील वन्यजीवांचे अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक