Dainik Maval News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सेवा रस्त्यालगत अनेक व्यवसाय आहेत. ह्या व्यवसाय ठिकाणी येणारी वाहने, मालवाहतूक वाहने ही सेवा रस्त्यावर उभी केली जात असल्याने येथून प्रवास करणाऱ्या अन्य वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. येथील व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी येणारी वाहने थेट सेवा रस्त्यावर उभी करीत आहेत, यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. इतर वाहन चालक त्रस्त होत आहेत. यामुळे थेट रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर व तेथील व्यवसायिकांवर कारवाईची मागणी होत आहे.
कामशेत येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ता आहे. या सेवा रस्त्यालगत दोन्ही बाजूंस अनेक लहान मोठे व्यवसाय आहेत. यातील दुकाने, मॉल आदी ठिकाणी दिवसभर ग्राहक व मालवाहतूक वाहनांची ये-जा सुरू असते. येथील व्यवसायिकांनी आपल्याकडे आलेली वाहने आपल्या हद्दीत उभी करणे अपेक्षित असताना तिथे येणारी वाहने ही थेट सेवा रस्त्यावर उभी केली जात आहेत. यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत असून सर्व व्यवसायिकांना याबाबत प्रशासनाने ताकीद देणे गरजेचे आहे, असे स्थानिक नागरिक, प्रवासी सांगत आहेत.
महामार्गालगत अनधिकृतरित्या दुकाने
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव ते कामशेत दरम्यान महामार्गालगत अनेक फळ विक्रेते, गॉगल्स विक्रेते व अन्य लहान-मोठे वस्तूंचे विक्रेते आपली दुकाने थाटून आहेत. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून येते. परंतु थेट महामार्गालगत असे व्यवसाय केले जात असल्याने भरधाव वेगात एखादे वाहन आल्यास अपघात होण्याचा धोका संभवतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ