Dainik Maval News : गेली अनेक वर्षांपासून रखडलेले पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध मागण्या यांबाबत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांची ( दि. ११ एप्रिल ) भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
आमदार सुनील शेळके यांनीही तातडीने पुनर्वसन मंत्री यांच्या सचिव यांचेशी बोलणे करून पुढील आठवड्यात मंत्रालयात याबाबत विशेष बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करून पुढील उपाययोजना करूयात, असे आश्वासन पदाधिकारी, धरणग्रस्त शेतकरी यांना दिले.
याप्रसंगी पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायणराव बोडके, माजी अध्यक्ष रविकांत रसाळ, कार्याध्यक्ष रामभाऊ कालेकर, सचिव बाळासाहेब काळे , पत्रकार रविभाऊ ठाकर, कायदेविषयक सल्लागार ॲड. संजय खैरे, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब मोहोळ, संतोषभाऊ कडू, किसनदादा घरदाळे, मारूती दळवी, सुधीर घरदाळे, अनंता वर्वे, अनिल तुपे, अनंता खैरे, आत्माराम लायगुडे, स्वप्नील तुपे व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात
– दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
– अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत
– मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
