Dainik Maval News : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे आता ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांत, रविवार सुट्टीच्या दिवशीही, दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागद पत्रासह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करता येतील. सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना निर्गमित करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
