Dainik Maval News : महाशिवरात्री यात्रा सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा सोहळा गुरुवार दि २० फेब्रुवारी २०२५ पासून ते गुरुवार दि २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार असून ह्या सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
- सोहळ्यात ह भ प तुकाराम महाराज मुळीक, ह भ प पद्माकर महाराज पाटोळे, ह भ प पंकज महाराज गावडे, ह भ प माऊली महाराज कदम (मोठे), ह भ प पुंडलिक महाराज मोरे, ह भ प माऊली महाराज कदम (धाकटे) हभप श्रीकांत महाराज पातकर यांची कीर्तने होणार आहेत. काल्याचे कीर्तन ह भ प संतोष महाराज पायगुडे यांचे होणार आहे.
याशिवाय दररोज काकड आरती, गाथा पारायण, महिला भजन, हरिपाठ, कीर्तन, हरी जागर आधी कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दररोज महाप्रसाद वाटपही करण्यात येणार आहे.
बुधवार दि १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता घोरावडेश्वर मंगल कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक रामदास काकडे, विश्वस्त किसन आबाजी भेगडे व कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री क्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र घोरावडेश्वर प्रासादिक दिंडी व श्रीक्षेत्र घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रघुवीर शेलार, भाऊसाहेब पानमंद, मधुकर बोडके, शिवाजी सावंत, राजेश मु-हे, योगेश शेलार आदीजण विशेष प्रयत्न करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News