Dainik Maval News : रविवारी (दि.१५) महाशिवरात्री असून या पार्श्वभूमीवर शिवमंदिर असणाऱ्या ठिकाणी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाकडून रविवारी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे शहर जवळील श्री क्षेत्र बनेश्वर, निळकंठेश्वर आणि मावळातील घोरवडेश्वर या शिव मंदिरांकडे जाण्यासाठी तीन अतिरिक्त मार्गांवर बसेस धावणार असून नियमित मार्गांवरील गाड्यांची फेऱ्या वाढविण्यात आली आहे.
तीन अतिरिक्त मार्ग
महाशिवरात्रीदिनी कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा), स्वारगेट ते निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर) आणि निगडी (पवळे चौक) ते घोरावडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या तीन अतिरिक्त मार्गांवर पहाटेपासून बसेस चालविण्यात येणार आहेत.
घोरवडेश्वरसाठी १५ मिनिटांच्या अंतराने बस
मावळमधील श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सात मार्गांवर बससंख्या वाढविण्यात आली आहे. कात्रज ते वडगाव मावळ (क्र. २२८), पवळे चौक ते वडगाव मावळ (क्र. ३०५), निगडी ते बेबड ओव्हळ (क्र. ३३२), निगडी ते उर्सेगावमार्गे तळेगाव (क्र. ३४१), निगडी ते उर्सेगावमार्गे परंदवाडी (क्र. ३४२), निगडी ते लोणावळामार्गे कामशेत (क्र. ३६८) आणि निगडी ते टाकवे फळणे फाटा (क्र. ३७१) या मार्गांवर सरासरी १० ते १५ मिनिटांच्या अंतराने बसेस उपलब्ध असतील.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
