Dainik Maval News : पवित्र श्रावण मासातील दुसऱ्या सोमवार चे औचित्य साधून मावळ तालुक्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्री क्षेत्र घोरावडेश्वर देवस्थान घोरावडी, श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान देहूगाव येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि उपवास धरणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन, दर्शनार्थी भाविकांच्या सोयीसाठी हे फराळ वाटप आयोजित केल्याचे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ( On occasion of Shravani Somvar Ravindra Appa Bhegde Yuva Manch Distributed Snacks In Shiva temples )
याप्रसंगी घोरावडेश्वर येथे प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे रघुवीर शेलार, श्रीकृष्ण भेगडे, महेद्र सुतार, अभिजीत भेगडे, गोविंद अल्लाट, योगेश शेलार, कोंडेश्वर मंदिर जांभवली येथे भाजपा युवा वॉरियर्सचे प्रणेश नेवाळे, त्यांचे युवा सहकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देहूगाव येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष हागवणे, राहुल भेगडे, सचिन काळोखे, मयूर शेलार, सागर मुसुडगे, रायबा मोरे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News
– विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे
– कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News