Dainik Maval News : पान टपरी मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच ने शनिवारी (दि.1) आदर्श नगर बस स्टॉप जवळ, किवळे येथे केली आहे.
मोहम्मद रब्बुल रेजाउल मोमीन (वय 32, रा. आदर्श नगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमीन याने त्याच्या टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर टपरीवर कारवाई करत पोलिसांनी अठरा हजार पाचशे दहा रुपये किमतीचा केसर पान मसाला तसेच तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक