व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा बस स्टँडवरील सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करा ; शिवसेना उबाठा पक्षाचे पोलीस व डेपो प्रमुखांना निवेदन

शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा बस डेपोची पाहणी करून तेथील सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 3, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Shiv Sena UBT Party statement to police regarding security of Lonavla bus station

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुण्यातील स्वारगेट बस डेपोत काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणावळा बस स्थानकाच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा बस डेपोची पाहणी करून तेथील सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी, बस डेपोमध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक नियुक्‍त करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

त्यानंतर, प्रतिनिधींनी लोणावळा बस डेपो व्यवस्थापकांना निवेदन देऊन आवश्यक त्या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन, स्वारगेट घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

  • लोणावळा बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील पक्षाच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटक श्रीमती शादान चौधरी, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख परेश बडेकर, शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, शिवसेना शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, भगवान देशमुख, शिवसेना उपशहर प्रमुख विजय आखाडे, नरेश काळवीट, विभाग प्रमुख संजय उर्फ पिंटू शिंदे, विभाग संघटक गणेश फरांदे, महिला आघाडी उप शहर संघटक प्रतिभा कालेकर, महिला आघाडी विभाग संघटक शोभा चव्हाण व शिवसेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर

Next Post

पान टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक । Dehu Road Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

पान टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.