Dainik Maval News : बेकायदेशीरपणे गॅस रिफील केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २९) रात्री वराळे फाटा, मावळ येथे करण्यात आली. सत्यवान वेंकटराव बिरादार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादार हा घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये धोकादायकपणे गॅस रिफील करत होता.
त्यासाठी त्याने सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नाही. चोरून भरलेले लहान सिलेंडरची तो चढ्या दराने बाजारात विक्री करत होता. गुन्हे शाखेने कारवाई करत बिरादार याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway