Dainik Maval News : बेकायदेशीररित्या दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला अटक केली. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी नवलाख उंब्रे गावच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
चेतन तुळसीराम दरेकर (वय ३५, रा. कुंभारवाडा, नवलाखउंब्रे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार रमेश सोमीनाथ घुले (वय २७) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चेतन दरेकर हा नवलाख उंब्रे गावच्या परिसरात बिगर परवाना देशी दारू विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्याकडून एक हजार ९२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link