Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. ३ सप्टेंबर ) रोजी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील किलोमीटर 36.200 येथे मुंबई मार्गिकेवर हा अपघात झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर 36.200 किमी येथे मुंबई लेनवर MH 12 VF 2919 क्रमांकाचा टेम्पो मुंबई दिशेने प्रवास करत असताना भरधाव वेगात पुढे चालणाऱ्या गाडी नंबर DD 02 D 0192 ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टाटा टेम्पो ची ट्रेलरला बसलेल्या जोरदार धडकेत टाटा टेम्पो मधील पॅसेंजर समोरील ट्रेलरच्या चाकामध्ये जाऊन अडकला व जागेवर मृत झाला.
टाटा टेम्पो मधील चालक अडकला असता कंपनी देवदूत यंत्रणेच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील कारवाई करताना मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात हलविण्यात आला आहे. हा अपघात खोपोली पोलीस ठाणे हद्दीत झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
