व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘निसर्ग हाच खरा देव, त्याचे संवर्धन व संरक्षण करा’, रवी केदारी यांचे आवाहन ; दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा निर्धार

नेहमीच वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाला आपलासा वाटणारा कलाधिपती गणराया प्रत्येक कलाकाराला सदैव नवनिर्मितीची प्रेरणा देत असतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 4, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Nature is true God conserve and protect it appeals Ravi Kedari resolve to hold eco-friendly Ganeshotsav

Photo Courtesy : Team Dainik Maval


“प्रत्येकाच्या पायाला लागते माती, कोणी आवर्जून ती लावतो माथी..
कोणी गोळा बनवून देतो आकार, बाप्पा घडवून, गणेशोत्सव होईल साकार..”

Dainik Maval News : नेहमीच वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाला आपलासा वाटणारा कलाधिपती गणराया प्रत्येक कलाकाराला सदैव नवनिर्मितीची प्रेरणा देत असतो. वास्तविक काळात निसर्ग हाच खरा देव आहे. अनंत काळापासून तो आपल्याला भरभरून देत आलाय आणि पुढेही देत राहील. त्याचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही काळाची गरज बनली आहे. निदान आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो. एक लहान कृती देखील मोठ्या बदलाकडे जाण्यासाठी पहिलं पाऊल ठरू शकते. त्याची सुरुवात स्वतःपासून होण्यास काय हरकत आहे. असे ताजे गावातील रवी दत्ता केदारी यांनी आपले मत मांडले आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागात पोलीस पदी कार्यरत असणारे मावळातील ताजे गावातील रवी दत्ता केदारी हे गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांना चित्रकलेची आवड असल्याने सुरवातीला २०२० साली शेतातील मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती साकारली होती. तेव्हापासुन दरवर्षी पूर्णपणे शाडूच्या मातीचा वापर करून मूर्ती साकारून ती घरी बसवून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहोत.

मूर्तीच्या माध्यमातून ‘मुली जगवा, मुली शिकवा’ , ‘वृक्षतोड थांबवा ‘, ‘ वारकरी सांप्रदाय’ , ‘ पर्यावरण रक्षण काळाची गरज’ अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांना स्पर्श करणार्‍या बाप्पाच्या मूर्ती बनवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. यंदाचे हे शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याचे सलग सहावे वर्ष. यावर्षी जगद्गुरू संत तुकोबाराय रूपातील गणेश मूर्ती साकारण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. मूर्ती बनवताना कामशेत येथील प्रसिद्ध मूर्तिकार शिंदे काका यांचे मार्गदर्शन लाभत आले आहे.

“आम्ही घरी बनविलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रींचे विसर्जन घरीच करतो. अवघ्या दीड-दोन तासात मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते. त्या मातीत आम्ही एक आठवण म्हणून एक झाड लावतो. ते झाड निसर्गात विलीन होतं. लावलेल्या झाडाच्या रुपात बाप्पाची ही कलाकृती आणि आठवण आयुष्यभर सोबत राहते.” – रवी सुगंधा दत्ता केदारी

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे : विसर्जन मिरवणुकीत गोल्डन रोटरी तर्फे मोफत पाणी सेवा, उपक्रमाचे नागरिकांकडून कौतूक

Next Post

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू । Accident On Expressway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू । Accident On Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.