व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भुमकर चौकातील एकेरी वाहतुकीमुळे स्थानिकांना मनस्ताप, तत्काळ उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे

आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक, विनोदेवस्ती व लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 27, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
MP-Srirang-Barne

Photo Courtesy : Facebook / MP Shrirang Barne


आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक, विनोदेवस्ती व लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. एकेरी वाहतूक पद्धतीमुळे नागरिक, व्यापारी यांना दोन किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक विनोदेवस्ती आणि लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या एकेरी वाहतूक पद्धतीमुळे त्या भागातील नागरिक, व्यापारी यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. किरकोळ कामासाठी सुद्धा दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. हे त्रासदायक ठरत आहे. त्याच भागातून जाताना वाहतूक कोंडी होत असून पादचा-यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. ( one way traffic in bhumkar chowk causing distress to locals said MP Shrirang Barane )

या संदर्भात याभागतील नागरिक व व्यापारी यांनी त्यांना होणा-या त्रासाची कैफियत माझ्याकडे मांडली आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढावा. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे आपण गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरित उपाययोजना कराव्यात, असे बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

अधिक वाचा –
– एकट्या सचिवाच्या सहीचा दाखला उपयोगाचा नाही! पीडीसीसी बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदारांसाठी महत्वाची बातमी
– मावळात वनविभागाला प्रथमच स्वतंत्र रेस्क्यू व्हॅन, अधिकारी-कर्मचारी आनंदित – पाहा व्हिडिओ


Previous Post

एकट्या सचिवाच्या सहीचा दाखला उपयोगाचा नाही! पीडीसीसी बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदारांसाठी महत्वाची बातमी

Next Post

आमदार सुनिल शेळकेंसाठी 28 मे रोजी वडगावमधील पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

आमदार सुनिल शेळकेंसाठी 28 मे रोजी वडगावमधील पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.