Dainik Maval News : राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख सातबारा ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले आहे तिथे 100 टक्के ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
- राज्यात 42 लाख 34 हजार फेरफार ऑनलाईन पद्धतीने दिल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले, की, यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली आहे. राज्यातील सव्वाचार हजार गावांमधील कोणत्याही सातबाराची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे. ही एक अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे
मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोळीवाड्यांची परिस्थिती, तेथील घरे याची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कोळीवाड्यांच्या विकासाची कार्यवाही करण्यात येईल. महसूल विभाग सक्षमपणे काम करत असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News