Dainik Maval News : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याबाबत मुदतवाढ मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये केवळ २१ हजार वाहन चालकांनी नंबर प्लेट पासून घेतली आहे. तर, १ लाख ३४ हजार ४४५ जणांनी नोंदणी केली आहे.
- पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना 30 जूनपर्यंत एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवून घेणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे.
परंतु, त्याला वाहन चालकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच, केंद्राकडून वेळ लागत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झालेले आहेत. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांत वाहनांना ‘एचएसआरपी’ लावण्यात येत आहेत.
एचएसआरपी बसवण्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी 36 केंद्र स्थापन करण्यात आली होती. मात्र, वाहन चालकाच्या तक्रारी आणि ही प्लेट बसवण्याबाबत लागणारा वेळ हे पाहता या केंद्रामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातून 41 केंद्रातून वाहन चालकांना नंबर प्लेट बसून मिळणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News